चिपळूण : वंदे भारतची धडक बसून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण : वंदे भारतची धडक बसून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

 

चिपळूण तालुक्यातील पेढे–पानकरवाडी येथील गणेश शंकर पानकर (वय ३१) या तरुणाचा वंदे भारत एक्स्प्रेसची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी वालोपे रेल्वे स्थानकाजवळील फरशी तिठा पूल परिसरात घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पानकर रेल्वे रुळ ओलांडत असताना येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 

मयत गणेश पानकर यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे पेढे परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]