शहापूर तालुक्यात राहूल नगर येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर तालुक्यात राहूल नगर येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न

शहापूर: विठ्ठल धारवणे 

शहापूर तालुक्यात राहुल नगर येथे मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठ्या भक्तीभावाने दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. ह्यावेळी रमेश अण्णासाहेब घेगडे पाटील व घेगडे परिवारातर्फे अनेक भाविक भक्तांचे आभार मानण्यात आले, 

विशेष म्हणजे हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज डोंगरे यांनी सहकुटुंब सहपरिवार व आपल्या भगिनीसह येऊन या ठिकाणी हरिपाठ व दत्त जन्माचे कीर्तन केले त्यांचे मनोमन घेगडे परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वर्षाचे त्यांना निमंत्रण देण्यात आले

भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून साजरा होणारा हा उत्सव तालुक्यातील विविध दत्त मंदिरांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर मोठ्या उत्साहात पार पडला.

 

🌟 प्रमुख आकर्षणे आणि कार्यक्रम:

सकाळची महापूजा: दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती आणि त्यानंतर देवाला महाअभिषेक घालण्यात आला. भाविकांनी मोठ्या संख्येने या पूजेत सहभाग घेतला.तसेच सहा महिलांनी सात दिवस पारायण केले सातव्या दिवशी पारायण समाप्ती झाली, व संध्याकाळी हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज डोंगरे यांचे जन्माचे कीर्तन व हरिपाठ आसा, भरगच्च कार्यक्र या ठिकाणी झाला आणि समृद्धीसाठी दत्त याग आणि हवन आयोजित करण्यात आले होते, ज्यात यजमानांनी आहुती दे यामुळे भाविकांमध्ये धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली.

उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग अनेक संस्थांनी आणि भाविकांनी

दिव्यांची रोषणाई: मंदिरांवर आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे रात्रीचे दृश्य मनमोहक दिसत होते. अनेक भाविकांनी आपल्या घरीही दीपोत्सव साजरा केला.

या उत्सवादरम्यान भाविकांनी “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या नामघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात

आल्यामुळे उत्सव शांततेत व उत्साहात पार पडला.


नंदकुमार बागडेपाटील ~अहिल्यानगर.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]