धामापूर गटात उबाठा शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धामापूर गटात उबाठा शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली

अजय चव्हाण यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश

संगमेश्वर :

धामापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक पकड पुन्हा एकदा भक्कम होत असल्याचे चित्र आहे. पक्षाचे नेते, सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उद्योजक अजय चव्हाण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधत पक्षात जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

 

ग्रामीण भागातील उद्योजक वर्गाचा शिवसेनेवर वाढता विश्वास आणि त्यातून उभी राहत असलेली संघटनशक्ती ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी महत्त्वाची ठरणारी आहे.

 

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक व उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख नेहा माने, उपजिल्हा संघटिका व माजी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर यांच्यासह विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

 

याशिवाय सावर्डे उपतालुका प्रमुख संदीप राणे, राजाभाऊ नारकर, सचिन शेट्ये, विभाग प्रमुख अनिल मोरे, सागर सावंत, अजित गुजर, तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन चोरगे, संगमेश्वर महिला आघाडी संघटिका मेघा कदम तसेच चिपळूण महिला आघाडीच्या सोनाली चव्हाण, रेश्मा चव्हाण, नंदिनी जड्याळ, पूनम चाळके, वृषाली पाटणकर आणि युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. ही उपस्थिती पक्षाच्या तळागाळातील वाढती संघटनशक्ती दर्शविणारी होती.

 

कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण राजकीय संदेश देण्यात आला. स्थानिक प्रश्न, संघटनाची दिशा आणि आगामी निवडणूक रणनीती यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

 

धामापूर गटातील हे शक्तीप्रदर्शन केवळ पक्षप्रवेशापुरते मर्यादित न राहता, शिवसेना (उबाठा) अधिक संघटित, सज्ज आणि ठामपणे आगामी निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचा स्पष्ट संदेश देणारे ठरले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]