भाजपा कार्यकर्त्यांची बैठक गुहागर येथे उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपा कार्यकर्त्यांची बैठक गुहागर येथे उत्साहात संपन्न

 

जि.प., पं. स. निवडणूक जिंकण्याचा निर्धार

आबलोली (संदेश कदम)

भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या राजकीय पक्षाची बैठक गुहागर येथे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांनी श्रीफळ वाढवून जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रचाराचा शुभारंभही केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसत होता.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात सर्व जागा आपण प्रामाणिकपणे लढवायच्या आहेत. युतीचा निर्णय काय करावा यासंदर्भात आपले वरिष्ठ नेते निश्चितच निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका ताकतीने लढवायच्या आहेत. यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा..! असा आदेश हि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांनी दिला. नुकतीच गुहागर नगरपंचायत निवडणूक आपण यशस्वीपणे लढवली आहे यामध्ये आपल्यालाच आहे यात कोणते मात्र शंका नाही. ज्याप्रमाणे नगरपंचायत निवडणूक आपण लढवली. त्याच प्रमाणे आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवू. त्यासाठी आपल्याला आत्ता पासूनच तयारी करावी लागणार असल्याचे सतीश मोरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुकाध्यक्ष अभयशेठ भाटकर यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे. निवडणूक नियोजन आणि कार्यकर्त्यांचा समन्वय एकच असला पाहिजे या संदर्भात मौलिक मार्गदर्शन भाजपाचे तालुकाध्यक्ष अभयशेठ भाटकर यांनी केले. त्यानंतर गुहागर समुद्रकिनारी सर्व कार्यकर्त्यांच्या गाडया एकत्र करून “भारत माता की जय”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष अभयशेठ भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर, भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्रीमती.नम्रता निमूणकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष मंगेश रांगले, संदीप साळवी, विजय भुवड यांचे सह. गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]