वाटद कवठेवाडी शाळेचा क्रीडा क्षेत्रात दबदबा कायम; केंद्रस्तरीय हिवाळी स्पर्धेत सलग चौथ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाटद कवठेवाडी शाळेचा क्रीडा क्षेत्रात दबदबा कायम; केंद्रस्तरीय हिवाळी स्पर्धेत सलग चौथ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी

 

सांघिक व वैयक्तिक खेळातील दमदार कामगिरीतून पुन्हा एकदा यशाचा इतिहास

 

रत्नागिरी प्रतिनिधी :– निलेश रहाटे

 

रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील हिवाळी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद खंडाळा यांच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीने उत्कृष्ट सांघिक व वैयक्तिक कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी केंद्राचे सर्वसाधारण विजेतेपद (चॅम्पियन ट्रॉफी) पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.

 

विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना मिळावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने दरवर्षी हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धांमध्ये वाटद कवठेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष चमक दाखवत कबड्डी मुलगे, खो-खो मुलगे आणि लंगडी या सांघिक क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला, तर खो-खो मुली या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.

 

वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. थाळीफेक मुलगे – मयुरेश मारुती कुर्टे (प्रथम), गोळाफेक मुलगे – रुद्र माधव अंकलगे (प्रथम), लांब उडी मुलगे – शुभम शरद बारगुडे (प्रथम) व स्वराज महेश तांबटकर (द्वितीय), लांब उडी मुली – स्वरा विश्वनाथ कुर्टे (तृतीय), उंच उडी मुलगे – स्वराज महेश तांबटकर (प्रथम), धावणे मुली – दुर्वा मारुती कुर्टे (द्वितीय) आणि बुद्धिबळ मुली – मिताली महेश माने (प्रथम) यांनी आपल्या खेळातील कौशल्य सिद्ध करत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.

 

या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीच्या जोरावर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीने वाटद केंद्राचे सर्वसाधारण विजेतेपद सलग चौथ्यांदा पटकावण्याचा मान मिळवला आहे.

 

या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे, उपशिक्षिका राधा नारायणकर, बालरक्षक विश्वनाथ विठ्ठल शिर्के, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता नितीन कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, सदस्य उदय दामाजी रहाटे, पालक पंकेश धनावडे तसेच वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी व वाटद धोपटवाडी येथील पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून विद्यार्थ्यांना नियमित सराव व मार्गदर्शन दिले.

 

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती रत्नागिरीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख संतोष मोहिते, वाटद ग्रामपंचायतीचे सरपंच अमित वाडकर, ग्रामविकास अधिकारी आर. पी. प्रक्षाळे यांच्यासह शाळा विकास समितीचे सदस्य, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

 

सातत्य, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर मिळविलेल्या या यशामुळे वाटद कवठेवाडी शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]