सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी समृद्धी आंबेकरची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी समृद्धी आंबेकरची निवड

११ जानेवारीला चिपळूणला पुरस्कार वितरण होणार 

आबलोली (संदेश कदम)
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे वितरित होणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इ.१० वी मधील विद्यार्थिनी कु.समृध्दी सुरेश आंबेकर हिची निवड जाहीर करण्यात आली .
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती नुकत्याच होऊन रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली. सदर सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण समारंभ रविवारी ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे संपन्न होणार आहे. पाटपन्हाळे विद्यालयाची समृद्धी आंबेकर हिची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण , पर्यवेक्षक एस.एस.मोरे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच पत्रकार , मित्रपरिवार व सगेसोयरे आदींनी कु.समृध्दी आंबेकर व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]