गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीचा दबदबा कायम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीचा दबदबा कायम

आबलोली (संदेश कदम)

53 वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे येथे उत्साहात संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयाचे विद्यार्थी कु. वल्लभ महेंद्र ठाकूर यांने दिव्यांग गटातून प्राथमिक मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर दिव्यांग गट माध्यमिक मधून कुमार नीरज पवार त्याने दिव्यांग गट माध्यमिक मधून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून कु. रुद्र राकेश साळवी, शौर्य नरेश पावस्कर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी निमित्त वैज्ञानिक प्रतिकृती माध्यमिक गटातून उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला दबदबा कायम राखल्याने या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक वैभव ढवळ यांचे लोक शिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतशेठ बाईत, कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, मुख्याध्यापक डी.डी. गिरी, शाळा व्यवस्थापन कमिटी व अधिकारी आणि सदस्य तसेच शिक्षक कर्मचारी यांचेसह आबलोली पंचक्रोशीतून विविध सामाजिक, धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]