अंजनवेल नंबर २ शाळेची क्रीडा स्पर्धेत बाजी; सलग कित्येक वर्षाची परंपरा याहीवर्षी कायम ठेवत पटकावली ‘जनरल चॅम्पियनशिप’

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंजनवेल नंबर २ शाळेची क्रीडा स्पर्धेत बाजी; सलग कित्येक वर्षाची परंपरा याहीवर्षी कायम ठेवत पटकावली ‘जनरल चॅम्पियनशिप’

अंजनवेल (प्रतिनिधी):

अंजनवेल केंद्राच्या क्रीडास्पर्धा यावर्षी जिल्हा परिषद आदर्श शाळा वेलदुर घरटवाडी शाळेत दिनांक 15/12/2025 रोजी मा. केंद्रियप्रमुख आरोही शिगवण मॅडम, क्रीडा समिती अध्यक्ष मा. डॉक्टर मनोजजी पाटील सर, सचिव मा. रमेशजी शिंदे सर आणि केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कबड्डी राज्यस्तरीय पंच प्रभू हंबर्डे सर तसेच जिल्हास्तरीय पंच निलेशजी खामकर सर, वेलदुर गावचे उपसरपंच जावळे साहेब , खो – खो चे पंच प्रमुख निलेश जी पाटील सर, गणेश जी विचारे सर, कबड्डी चे पंच प्रमुख तुकारामजी नांदगावकर सर, मा. समिरजी बामणे सर, मा. नदीमजी कोतवडेकर सर, अवधूत राउतराव सर, धावणे क्रीडाप्रकाराचे पंचप्रमुख अनिल जी शिंदे सर, थाळीफेक पंच प्रमुख महेश जी आंधळे सर, बलशेटवार सर, लंगडी पंच प्रमुख जोशी मॅडम, खामकर मॅडम, कब्बडी पंच मोरे मॅडम, बागल मॅडम, खो – खो पंच गायकवाड मॅडम, गावित मॅडम, वेल्हाळ मॅडम ,मुल्ला मॅडम, आदीबा मॅडम, वेलदुर उर्दू च्या मॅडम लंगडी पंच, क्रीडाप्रेमी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या सहयोगातून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. मा. केंद्रियप्रमुख शिगवण मॅडम यांनी सर्व खेळ प्रकारच्या ट्रॉफ्या देऊन एक आदर्श सर्वांपुढे निर्माण केला.क्रीडा समिती अध्यक्ष श्री मनोज जी पाटील सर यांनी जनरल चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी दिली. तसेच वेलदुर घरटवाडी शाळेच्या शा. व्य. स. अध्यक्ष राजेशजी जावळे, ग्रामस्थ, महिला मंडळी वेलदुर घरटवाडी यांच्या प्रयत्नातून यशस्वी पार पडल्या.

क्रीडा वृत्तांत-

या वर्षी 2025 सालातील पार पडलेल्या हिवाळी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाचा दबदबा कायम राखत, जिल्हा परिषद आदर्श शाळा अंजनवेल नंबर २ च्या खेळाडूंनी विविध खेळप्रकारांत घवघवीत यश संपादन केले आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरी आणि खेळाडूंच्या जिद्दीच्या जोरावर या शाळेच्या खेळाडूंनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिष्ठेची ‘जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी’ 98 गुण घेत आपल्या नावावर केली. तर त्या खालोखाल 60 गुण मिळवत अंजनवेल उर्दू शाळेच्या खेळाडूंनी अतिशय दमदार कामगिरी करत या वर्षी 2 नंबर मिळवला. तर वेलदुर घरटवाडी यजमान शाळेतील खेळाडूंनी 51 गुण घेत 3 नंबर चे स्थान पक्के केले, वेलदुर नवानगर मराठी शाळेतील खेळाडूंनी चुरशीचा खेळ दाखवत 49 गुण घेत या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला , तसेच वेलदुर नंबर 1 शाळेच्या खेळाडूंनी 36 गुण घेत स्पर्धेतील आपली चुणूक दाखवून दिली.

स्पर्धेचा सविस्तर वृत्तांत

नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध प्राथमिक शाळांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये धावणे, लांब उडी, खो-खो, कबड्डी यांसारख्या वैयक्तिक आणि सांघिक मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. अंजनवेल नंबर २ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच सर्व खेळांमध्ये आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र सांघिक खेळांमध्ये इतर शाळांच्या खेळाडूंनी आघाडी घेत विजय मिळवला तरी सुद्धा शेवटी वैयक्तिक खेळ – प्रकारात अंजनवेल शाळेच्या खेळाडूंनी जिद्दीने खेळून पुन्हा एकदा आघाडी घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवले, आणि हातातून निसटून चाललेली जनरल चॅम्पियनशीप ट्रॉफी पुन्हा एकदा मोठ्या फरकाने आपल्या नावावर केली.

*विजयाचा जल्लोष*

विजेतेपद जाहीर होताच खेळाडूंनी आणि शिक्षकांनी एकच जल्लोष केला. शाळेच्या या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेले कष्ट आणि सरावामुळेच आम्हाला ही ट्रॉफी पुन्हा एकदा मिळवता आली,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

 

शाळेने आपला ‘जनरल चॅम्पियन’चा किताब यावर्षीही कायम राखला.

केवळ एकाच खेळात नव्हे, तर बहुतांश सर्व खेळप्रकारांत शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले.

पारितोषिक वितरण: विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या यशामुळे अंजनवेल परिसरात शाळेचे आणि गुणवंत खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विजयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून, पुढील बीटस्पर्धेसाठी अंजनवेल केंद्रातील सर्व शाळांतील खेळाडू एकत्र खेळून गुहागर बीटस्तरावर अंजनवेल केंद्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]