युवा ग्रामविकास मंडळ सोगमवाडी (मुंबई) तर्फे दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा व स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

युवा ग्रामविकास मंडळ सोगमवाडी (मुंबई) तर्फे दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा व स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई – संदीप शेमणकर
युवा ग्रामविकास मंडळ सोगमवाडी (मुंबई), देवाचे गोठणे गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात अनेक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात.प्रती
वर्षा प्रमाणे या ही वर्षी दिनदर्शिका – २०२६ प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला स्नेहमेळावा रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी. हेमाली हॉल, नालासोपारा (प) येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम साठी उपस्थित मान्यवर
साखरी नाटे विभाग संपर्क प्रमुख तुळशीदास नवाळे, सोगमवाडीतील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, एक हुरहुन्नरी कलाकार बबन काका नारकर, तसेच जैतापूर (हूर्से) गावचे समाजसेवक विश्वनाथ धुरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात देवाचे गोठणे गावप्रमुख व सोगमवाडीचे वाडीप्रमुख विकास शांताराम सोगम तसेच सौ. वृषाली विकास सोगम, तसेच बबन नारकर, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सोगम व उपाध्यक्ष सुहास सोगम व राजेश सोडये यांच्या शुभहस्ते दीपप्रजवलनाने व छत्रपती शिवाजी महाराज व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाची प्रस्तावना व कार्यक्रमाचे उद्दिष्ट,मंडळाची स्थापनेपासूनची वाटचाल व यापुढील मंडळाचे उपक्रम यावर मंडळाचे सचिव योगेश दिलीप सोगम यांनी मार्गदर्शन केले.
दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन सोगमवाडीतील सर्व महिला व गाव प्रमुख विकास सोगम, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सोगम बबन काका नारकर, तुळशीदास नवाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमामध्ये महिलांचा हळदीकुंकू समारंभ, लहान मुले आणि महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ व सर्वांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये श्री. बबनकाका नारकर, श्री. तुळशीदास नवाळे, श्री. विश्वनाथ धुरी, सौ. आरती घरत, गावप्रमुख श्री. विकास शांताराम सोगम, सौ . वृषाली विकास सोगम तसेच सोगम वाडीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व दिलीप शांताराम सोगम,सुरेश रामकृष्ण सोगम,संजय वासुदेव सोगम व मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नारायण सोगम यांनी आपले मनोगत व्यक्त करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये ३५० च्या वरती सोगमवाडीतील मुंबई स्थित ग्रामस्थांनी संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र चंद्रकांत सोगम, दिलीप वसंत सोगम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले. तसेच दिनदर्शिका-२०२६ साठी जाहिराती देऊन ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी सचिन सोगम, महेश नाडणकर,नितेश सोगम, प्रविण सोगम, महेश सोगम, हर्षद सोगम, शैलेश सोगम,कु. स्वप्निल सोगम आणि इतर सर्व कार्यकर्ते तसेच श्री.आई जोगेश्वरी क्रिकेट संघ, सोगमवाडी व वाडीतील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.स्नेहमेळाव्यामध्ये घेण्यात आलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमामधील सहभागी व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.व
समारंभाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]