कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा – तालुका राजापूर दिनदर्शिका 2026 चा प्रकाशन सोहळा दणक्यात साजरा 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा – तालुका राजापूर दिनदर्शिका 2026 चा प्रकाशन सोहळा दणक्यात साजरा

 

मुंबई – संदीप शेमणकर 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरच्या दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन संघ मुख्य कार्यालय वाघे हॉल येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत झालं. मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता कुणबी ज्ञातीगृह, वाघे हॉल, परेल मुंबई येथे शाखा अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे , संघ खजिनदार महेश शिर्के, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर आणि समाजबांधव यांच्या उपस्थितीत दिनदर्शिकचे प्रकाशन झाले.

यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी तसेच राजापूर सन्मित्र पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर तोरस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव प्रभाकर वारीक, संघप्रतिनिधी मंडळाचे नव्याने निवड करण्यात आलेले चंद्रकांत लिगम, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रत्नाकर रायकर, दीपक इंगळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तुकाराम मोंडे, युवक मंडळाचे अध्यक्ष वैभव वालम, विवाह सल्लागार मंडळ उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर तसेच शाखेचे आणि युवक मंडळाचे पदाधिकारी, राजापूर पतसंस्थेचे संचालक बहुसंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णा वणे, चंद्रकांत बावकर यांनी राजापूर शाखेच्या सामाजिक उपक्रमातील बहुमूल्य योगदानाबद्दल भरभरून कौतुक केले.आणि दिनदर्शिका प्रकाशनाच्या शुभेच्छा दिल्या.

शाखा अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांनी मनोगत व्यक्त करताना शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गेल्या वर्षभरात शाखेने हाती घेतलेल्या उपक्रमात विशेषतः कुणबी एल्गार मोर्चा, संघ संस्थापक माळी गुरुजी पुतळा उभारणी तसेच ओबीसी आरक्षण निधी संकलन अशा विविध उपक्रमात आपण सर्वानी सहभाग होऊन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी शाखा सचिव अनिल भोवड यांनी मनोगत व्यक्त करताना शाखेची आर्थिकस्थिती मजबूत करण्याकरिता तसेच सध्या सुरु असलेल्या ओबीसी – कुणबी आरक्षण बचाव यासाठी न्यायालयात सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्याकरिता लागणारा निधी उभारणीसाी समाजात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शाखा आणि युवक मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व समाज बांधवांचे आणि प्रामुख्यांचे जाहिरात देऊन सहकार्य करणाऱ्या सर्व जाहिरातदारांचे, राजापूर सन्मित्र पतसंस्था, शिक्षण प्रसारक मंडळ, युवक मंडळ, ग्रामीण समिती, कुणबी पतसंस्था गाव तसेच वाडीमंडळे या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी शाखेचे खजिनदार जयवंत नाचणेकर, पतसंस्था संचालक मनोहर गोरिवले, सहसचिव देवेंद्र पेटावे, विवाह मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर तसेच पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर वारिक, व्यवस्थापक मनोज पुजारी, प्रिंटर सकपाळ, दीपक मोंडे, युवक मंडळाचे मनोहर नाडणकर, महेश गोंडाळ, सहसचिव संतोष जोगळे, परशुराम परवडे, रुपेश चौगुले, योगेश मासये यांचेदेखील खास कौतुक करण्यात आले.

यावेळी ज्यांनी ज्यांनी जाहिराती देऊन शाखेला आर्थिक सहकार्य करून उपकृत केले त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून आभार व्यक्त केले. शाखेचे उपाध्यक्ष संजय वारिक तसेच विवाह सल्लागार मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर यांचा 50 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

दिनदर्शिका समितीच्या वतीने जयवंत नाचणेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवर, समाजबांधव, जाहिरातदार यांचे आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]