आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त व्हीलचेअर बास्केटबॉल शोकेसचे आयोजन

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त व्हीलचेअर बास्केटबॉल शोकेसचे आयोजन

 

मुंबई, 17 डिसेंबर 2025:. समावेशन आणि क्रीडेमधील सकारात्मक परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी, आर्केड डेव्हलपर्स अंतर्गत कार्यरत सज्जन जैन सपोर्ट ट्रस्टने प्रोजेक्ट मुंबई यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त व्हीलचेअर बास्केटबॉल शोकेस सामन्याचे आयोजन केले.

 

क्रीडाक्षेत्रात सुलभता, समावेशकता आणि समान सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग खेळाडूंंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींची क्षमता, आत्मविश्वास आणि क्रीडाक्षेत्रातील त्यांचा सहभाग अधोरेखित करण्यात आला. तसेच क्रीडा ही सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, हा संदेश देण्यात आला.

 

या उपक्रमाबाबत *आर्केड डेव्हलपर्सचे संचालक अर्पित जैन* यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “आर्केड डेव्हलपर्समध्ये आम्ही प्रगतीकडे केवळ पायाभूत सुविधांच्या उभारणीपुरते मर्यादित न ठेवता समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याच्या दृष्टीने पाहतो. व्हीलचेअर बास्केटबॉल शोकेससारखे उपक्रम सर्वसमावेशक समाजनिर्मितीप्रती आमची वचनबद्धता दर्शवतात, जिथे प्रत्येकाला सहभागी होण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळते. सज्जन जैन सपोर्ट ट्रस्ट आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्यासोबत या उपक्रमासाठी कार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.” हा उपक्रम सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें