दिवा शहर बळीराज सेनेच्या नेतृत्वात बदल; प्रवीण उतेकर यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिवा शहर बळीराज सेनेच्या नेतृत्वात बदल; प्रवीण उतेकर यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती

नवीमुंबई (मंगेश जाधव)
बळीराज सेनेचे पक्षप्रमुख मा. अशोकदादा वालम यांच्या आदेशानुसार दिवा शहराच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. कोकण प्रांतातील खेड़ तालुक्याचे भूमिपुत्र, आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्री. प्रवीण उतेकर यांची बळीराज सेनेच्या दिवा शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे श्री. गजानन शेलार यांची दिवा शहर प्रवक्त्यापदी निवड करण्यात आली आहे.
पक्षप्रमुख मा. अशोकदादा वालम साहेब यांच्या आक्रमक नेतृत्वावर विश्वास ठेवत ही नियुक्ती करण्यात आली असून, संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या नियुक्तीसाठी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख श्री. शाम जगताप व सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री. संजय चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.
या प्रसंगी पक्ष सरचिटणीस श्री. संभाजी काजरेकर, उपनेते श्री. राजाराम ढोलम, रायगड (उत्तर) जिल्हा प्रमुख श्री. प्रकाश चांदीवडे, पनवेल तालुका अध्यक्ष श्री. अनिल मोंडे, शाहपूर तालुका अध्यक्ष श्री. मधुकर शिंदे, गुहागर तालुका प्रमुख श्री. अरुण भुवड, भांडूप विधानसभा अध्यक्ष श्री. सुधाकर भोवड, लांजा तालुका सहसंपर्क प्रमुख श्री. श्रीधर पालकर, माहीम विधानसभा अध्यक्ष श्री. मनोहर डोंगरे, शाहपूर उपतालुका प्रमुख श्री. गुरुनाथ ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या नियुक्तीमुळे दिवा शहरात बळीराज सेनेची संघटना अधिक बळकट होऊन पक्षाच्या ध्येयधोरणांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]