आजाराला कंटाळून ३४ वर्षीय युवकाची आत्महत्या लांजा तालुक्यातील कुरचुंब येथे हृदयद्रावक घटना

rv ad

आजाराला कंटाळून ३४ वर्षीय युवकाची आत्महत्या

लांजा तालुक्यातील कुरचुंब येथे हृदयद्रावक घटना

लांजा | प्रतिनिधी 

लांजा तालुक्यातील कुरचुंब येथे आजाराला कंटाळून ३४ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २५ डिसेंबर) दुपारी उघडकीस आली. संदेश मनोहर पाष्टे (वय ३४, रा. कुरचुंब, ता. लांजा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

 

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश पाष्टे यांना मणक्याचा गंभीर आजार होता. या आजारामुळे त्यांना दीर्घकाळापासून तीव्र त्रास सहन करावा लागत होता. सततच्या वेदनांना कंटाळून संदेश यांनी घरात कोणीही नसताना बुधवारी दुपारी सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास घरातील लोखंडी बाराला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेनंतर मृत संदेश पाष्टे यांनी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असलेली चिठ्ठीही आढळून आली आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.


[ditty id=23248]

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें