निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात एक पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात एक पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त

पनवेल पोलिसांच्या गोपनीय माहितीमुळे आरोपी अटकेत 

नवीमुंबई (मंगेश जाधव)

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आधारे पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात साफळा लावून एक इसमास पिस्टल व ६ जिवंत काडतुसाह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव अनंथ अधिमुलम पाडायची वय-३६ रा सानपाडा,नवी मुंबई सांगितले असून त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि न.७८०/२०२५ महाराष्ट्र शस्त्र अधिनियम चे कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१)(३)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार करीत आहेत.

सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या सूचनेनुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार यांच्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ, पोलीस उपनिरीक्षक किरण राउत, पोलीस हवालदार प्रवीण पवार, पोलीस नाईक भोसले, पोलीस शिपाई काकडे, पोलीस शिपाई कराड, पोलीस शिपाई कधिनाथ लोखंडे आदींच्या पथकाने यशस्वी केली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें