सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व चिरे-खाण प्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व चिरे-खाण प्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक बैठक

 

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आज मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील वाळू प्रश्न तसेच चिरे-खाण व्यवसायिकांच्या विविध विषयांवर एक महत्त्वपूर्ण व सकारात्मक बैठक पार पडली.

 

या बैठकीत जिल्ह्यातील वाळू उपसा, चिरे-खाण व्यवसायाशी संबंधित अडचणी, नियमावली तसेच प्रशासनात्मक प्रक्रियांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कायदेशीर चौकटीत समन्वयाने मार्ग काढण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

 

यावेळी माजी मंत्री व आमदार मा. श्री. दीपकजी केसरकर, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. मनीषजी दळवी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत प्रशासनाकडून सध्याची परिस्थिती व अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील विकासाला चालना देत पर्यावरणाचा समतोल राखून वाळू व चिरे-खाण व्यवसायाबाबत योग्य निर्णय घेण्यावर भर देण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें