जि.प. आदर्श शाळा पूर्णागड नं.१ शाळेत HPV लसीकरण उत्साहात 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि.प. आदर्श शाळा पूर्णागड नं.१ शाळेत HPV लसीकरण उत्साहात 

रत्नागिरी

जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र पावस अंतर्गत उपकेंद्र पूर्णगड यांच्यामार्फत HPV लसीकरण उत्साहात पार पडले.

आरोग्य सेवक श्री अनिल धोपटे यांनी या लसीकरणाविषयी उत्तम प्रकारे माहिती दिली ‌व जागृती केली.लसीकरणासाठी आरोग्य सेवक श्री धोपटे, सिस्टर साळवी मॅडम, आशा पावसकर मॅडम उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तारये मॅडम, सदस्य , पालक उपस्थित होते.

उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी उत्तम सहकार्य केले. या लसीकरणाविषयी पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]