शिवसेना (UBT) चिपळूण नगर परिषद गटनेतेपदी विकी नरळकर यांची निवड.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना (UBT) चिपळूण नगर परिषद गटनेतेपदी विकी नरळकर यांची निवड.

पूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून चिपळूण नगरपालिकेत प्रभावी कामगिरी बजावली

चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण नगर परिषद गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक मिथिलेश ऊर्फ विकी मनोहर नरळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून, सत्तेच्या वाऱ्याला न झुकता जनतेच्या प्रश्नांना व वेदनांना प्राधान्य देणारा बुलंद आवाज म्हणून विकी नरळकर चिपळूणच्या राजकारणात पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून चिपळूण नगरपालिकेत प्रभावी कामगिरी बजावली असून, प्रशासकीय कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे.

सध्या चिपळूण नगरपालिकेत शिवसेना (उबाठा) गटाचे पाच नगरसेवक असून, नगर परिषदेत विरोधी बाकावर बसून शिवसेना (उबाठा) पक्षाचा निर्भीड, ठाम व जनहिताचा आवाज म्हणून विकी नरळकर काम करतील, अशी अपेक्षा पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसैनिकांचे न्याय्य हक्क, चिपळूणचा सर्वांगीण विकास तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्भीड विचारांची मशाल अधिक तेजाने पेटवण्याची जबाबदारी त्यांच्या नेतृत्वावर सोपवण्यात आली आहे.

विकी नरळकर यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून भगव्या शुभेच्छा दिल्या जात असून, चिपळूणच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]