ड्युटीवर जाताना बोटीतच काळाचा घाला; बँक व्यवस्थापकाचा दुर्दैवी मृत्यू

ड्युटीवर जाताना बोटीतच काळाचा घाला; बँक व्यवस्थापकाचा दुर्दैवी मृत्यू

दापोली | फेरीबोटीत चक्कर येऊन RDCC बँकेच्या व्यवस्थापकाचे निधन, परिसरात हळहळ

दापोली : ड्युटीवर जात असताना फेरीबोटीतच अचानक चक्कर येऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (RDCC) दाभोळ शाखेतील व्यवस्थापकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दापोली तालुक्यात घडली आहे.

चंद्रशेखर महादेव गराटे (वय ४९) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फेरीबोटीत अचानक प्रकृती बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गराटे हे मूळचे चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील रहिवासी होते.

ते २९ डिसेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी घरातून निघाले होते. गुहागर–शृंगारतळी मार्गे दाभोळ खाडीतील फेरीबोटीतून प्रवास करत असताना सकाळी सुमारे १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली.

बोटीतच ते अस्वस्थ झाल्याचे लक्षात येताच सहप्रवासी व बोटीवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करत त्यांना दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

उपचारापूर्वीच मृत घोषित

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर, चंद्रशेखर गराटे यांच्या पश्चात,पत्नी (माध्यमिक शिक्षिका), एक मुलगी, आई-वडील,,भाऊ व भावजय

असा परिवार आहे.

घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्यांची दाभोळ शाखेत बदली झाली होती.

पोलीस तपास सुरू

या घटनेची नोंद दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें