चिपळूण नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटनेतीपदी उमा उर्फ शिल्पा देसाई यांची निवड

चिपळूण नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटनेतीपदी उमा उर्फ शिल्पा देसाई यांची निवड

 

एकमुखी निर्णय; महिला नेतृत्वाला बळ, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

चिपळूण | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) संघटनेच्या वतीने चिपळूण नगरपरिषदेसाठी सौ. उमा उर्फ शिल्पा उदय देसाई यांची अधिकृतपणे गटनेतीपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या संदर्भात पार पडलेल्या पक्षाच्या अधिकृत बैठकीत नगरसेवक नसरीन मुश्ताक कडस यांनी सौ. उमा उर्फ शिल्पा देसाई यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशभाई कदम तसेच उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास एकमताने पाठिंबा दिला.

 

यानंतर ज्येष्ठ नेते रमेशभाई कदम यांनी गटनेतीपदी निवडीस अधिकृत मान्यता देत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. कोणताही वाद किंवा मतभेद न होता एकमुखी निर्णयातून ही निवड पार पडल्याने पक्षातील संघटनात्मक एकजूट अधोरेखित झाली आहे.

 

पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सौ. देसाई यांचे सामाजिक कार्य, पक्षासाठी केलेली निष्ठावान मेहनत तसेच सामान्य नागरिकांशी असलेला थेट आणि विश्वासार्ह संपर्क लक्षात घेऊनच त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अधिक प्रभावीपणे जनहिताची भूमिका मांडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

या निवडीमुळे महिला नेतृत्वाला बळ देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धोरणाला अधिक मजबुती मिळाली आहे. येत्या काळात नगरपरिषदेत विकासात्मक प्रश्न, नागरिकांच्या समस्या तसेच जनहिताच्या विषयांवर ठाम, सकारात्मक आणि आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

 

दरम्यान, सौ. उमा उर्फ शिल्पा उदय देसाई यांच्या गटनेतीपदी निवडीबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक संघटितपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहें.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें