धोपेश्वर (खंडेवाडी) ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

धोपेश्वर (खंडेवाडी) ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश…

युवानेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न…

राजापूर प्रतिनिधी पुरुषोत्तम खांबल

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील खंडेवाडी ग्रामस्थांनी आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. युवानेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.

लांजा–राजापूर–साखरपा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेला व झपाट्याने होत असलेला विकास, तसेच आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांची प्रभावी कार्यपद्धती लक्षात घेऊन खंडेवाडी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अपूर्वा म्हणाल्या की,
*“आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच आजपर्यंतचे काम यशस्वीपणे पूर्ण करता आले आहे. यापुढेही जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार आहोत. आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांना आपण दिलेल्या संधीच्या माध्यमातून मतदारसंघात शाश्वत विकास घडविण्याचा आमचा संकल्प आहे. या वाटचालीत आपले सहकार्य आम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण व्यक्त केलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”*

या पक्षप्रवेश सोहळ्यात गावकार धनंजय खंडे, अध्यक्ष रवींद्र बांदीवडेकर, गौरव शिंदे, प्रकाश बांदीवडेकर, अरविंद खंडे, संदीप शिंदे, जितेंद्र शिंदे, रमाकांत शिंदे, दिपेश सावंत, सिद्धेश शिंदे, आनंद शिंदे, विनोद शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.प्रकाश कुवळेकर, विभागप्रमुख श्री.जितेंद्र तुळसवडेकर, उपतालुकाप्रमुख श्री.राजन कुवळेकर, मा.विभागप्रमुख श्री. नरेश दुधवडकर, मा.उपसभापती श्री.उमेश पराडकर, श्री.योगेश नकाशे, श्री.प्रसन्न मालपेकर, सरपंच उमेश शिवगण मा.सरपंच श्री.सतीश खांबल, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम खांबल, नेत्रा निलेश सोगम, प्रसाद गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]