मंडणगडमध्ये ‘उबाठा’ गटाला खिंडार; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

मंडणगडमध्ये ‘उबाठा’ गटाला खिंडार; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

मंडणगड/मुंबई: 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंडणगड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला मोठा धक्का देत, अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राज्याचे मंत्री नामदार श्री. योगेश दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि विकासकामांनी प्रेरित होऊन अधिकृतपणे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुंबईतील कांदिवली येथील ‘पालखी’ बंगल्यावर शिवसेना नेते आदरणीय रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ‘धनुष्यबाण’ हाती

या प्रवेश सोहळ्यामध्ये मंडणगड तालुक्यातील ‘उबाठा’ गटाचे कंबरडे मोडले असून, युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री. गणेशजी बिल्लार यांच्या नेतृत्वाखाली कुंबळे, लाटवण पंचक्रोशी आणि तालुक्यातील विविध विभागांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने:

  • उमेश घागरूम (युवासेना उपतालुकाधिकारी)

  • दिपक बोर्ले (माजी सरपंच)

  • अतिश तांबे (युवासेना तालुका सचिव)

  • हेमत मोदी (तालुका समन्वयक)

  • प्रकाश महाडिक (आय.टी. सेल अधिकारी)

  • सोहम पारेख, प्रतिक पाटील, रोशन खैरे, राजेंद्र खैरे यांसह अनेक शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांचा समावेश आहे.

विकासकामांचा विजय: मंत्री योगेश कदम

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, “मतदारसंघातील सुरू असलेल्या विकासकामांचा वेग आणि सामान्य माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका पाहून आज हे सर्व सहकारी सोबत आले आहेत. मंडणगडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनीही नवीन सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दिग्गजांची उपस्थिती

या सोहळ्याला उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदेश केणे, दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सुधीर कदम, मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, तसेच युवासेना आणि शिवसेनेचे मुंबई व कोकणातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मंडणगड तालुक्यात शिवसेनेची (शिंदे गट) ताकद कैक पटीने वाढली असून, ठाकरे गटासमोर मात्र मोठे आव्हान उभे राहिले आहे.


RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें