चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा

चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा

 

चिपळूण :

चिपळूणचे माजी आमदार व माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सादर केल्याची माहिती दिली.

 

राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना रमेशभाई कदम म्हणाले की, पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरून कोणतीही दखल घेतली जात नाही. नगराध्यक्ष पदासाठी स्वतः उमेदवार होऊन आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. या संपूर्ण प्रक्रियेत वरिष्ठ नेतृत्वाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

 

“मी १९८४ पासून शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी पक्षात सक्रिय आहे. मंडळपासून ते राजापूरपर्यंत पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले. पक्षासाठी जे जे आवश्यक होते ते सर्व केले. मात्र सध्या पक्षात कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांना किंमत उरलेली नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

 

या पार्श्वभूमीवर पक्षात काम करण्याची इच्छाच उरलेली नसल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे रमेशभाई कदम यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे चिपळूण तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

–

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें