लांज्यातील शिक्षक संजय दळवी यांची NASA/ISRO साठी निवड; जिल्ह्यात प्रथम क्रमांक

 

लांज्यातील शिक्षक संजय दळवी यांची NASA/ISRO साठी निवड; जिल्ह्यात प्रथम क्रमांक

लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण

लांजा तालुक्यातील माजल शाळेतील पदवीधर शिक्षक श्री. संजय शिवाजी दळवी यांची NASA/ISRO साठी निवड झाल्याने तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षण विभाग, प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित ISRO/NASA जिल्हास्तरीय शिक्षक निवड चाचणी परीक्षा दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी पार पडली होती.

या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत RN 45 या नोंदणी क्रमांकाने श्री. संजय दळवी यांची NASA व ISRO साठी अंतिम निवड करण्यात आली आहे. ही निवड यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर भा.प्र.से. वैदही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांची सही आहे.

या निवड प्रक्रियेबाबत अत्यंत पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया पार पडल्याचे समाधान शिक्षक व शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. दळवी सरांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांनाही जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होऊ शकतात, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

श्री. दळवी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लांजा तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था, शिक्षक संघटना, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें