उद्योग दिशा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्योग दिशा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

रत्नागिरी :- निलेश रहाटे

नारी शक्ती फाउंडेशन आणि लाईफ टाईम उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “उद्योग दिशा” या मार्गदर्शन कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रत्नागिरी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमात स्वयंरोजगार, गृहउद्योग, बचत गटांच्या माध्यमातून सुरू करता येणारे उद्योग, भांडवल उभारणी, मार्केटिंग तसेच शासकीय अनुदानित योजनांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना उद्योगविश्वातील संधींची ओळख करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धनलक्ष्मी इंडस्ट्रीचे सीईओ श्री. संजय बगे, लाईफ टाईम उद्योग समूहाचे संस्थापक श्री. सचिन माजळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू भाटलेकर, श्री. प्रताप पवार, ॲड. प्रतिभा पवार तसेच रत्नसिंधू न्यूज मिडियाच्या वर्षा राजे निंबाळकर उपस्थित होत्या.

नारी शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक संजना मोहिते, अंतरा मोहिते, पौर्णिमा सावंत, दिपाली कांबळे, सुप्रिया कांबळे व सलोनी मोरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमास सुमारे १५० महिलांनी तर हळदी कुंकू समारंभास ३५० महिलांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी बोलताना रत्नसिंधू न्यूज मिडियाच्या संस्थापिका व संपादक वर्षा राजे निंबाळकर म्हणाल्या,

“महिलांना सक्षम होण्यासाठी असे उपक्रम अत्यंत लाभदायक ठरतात. आज मिळालेल्या ज्ञानाचा महिलांनी योग्य वापर करून स्वतः सक्षम व्हावे आणि आपल्या कुटुंबासह समाजही सशक्त करावा.”

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें