आम्हांला कुठचाही राजकीय वारसा नाही, फक्त तुमच्या मतरुपी आशीर्वादाची गरज – ॲड ज्योत्स्ना काताळकर

आम्हांला कुठचाही राजकीय वारसा नाही, फक्त तुमच्या मतरुपी आशीर्वादाची गरज – ॲड ज्योत्स्ना काताळकर

आबलोली (संदेश कदम)

आम्ही दोन्ही उमेदवार पूर्णपणे नवखे, नवीन उमेदवार आहोत आम्हाला कुठचाही राजकीय वारसा नाही, घराणेशाही नाही आम्ही सामान्य घरातले सामान्य कुटुंबातले तुमच्या आमच्यातले असे आम्ही दोन्हीही उमेदवार आहोत भास्कर जाधव साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे दोन्ही उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चांगली आहे ज्यांना प्रशासकीय गोष्टींचे किंवा शासकीय नियम शासकीय गोष्टी कशा चालतात याबद्दल आम्हाला चांगले ज्ञान आहे. तुम्ही सर्वांनी तुमचा मतदार रुपी आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमीच ठेवा आम्हाला कुठचाही राजकीय वारसा नाही, आम्हाला फक्त तुमच्या मत रुपी आशीर्वादाची गरज आहे. अशी भावनिक साद

शीर पंचायत समिती गणातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ॲड. ज्योत्स्ना विनायक काताळकर यांनी मतदार बंधू-भगिनींना घातली

गुहागर तालुक्यातील कोतळूक येथे समाजाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या बैठकीत शीर पंचायत समिती गणाच्या उमेदवार ॲड. ज्योत्स्ना विनायक काताळकर या बोलत होत्या.

ॲड. ज्योत्स्ना विनायक काताळकर पुढे म्हणाल्या की, आम्ही दोन्ही उमेदवार या तुमच्या मुलीच निवडणूक लढवत आहेत असे समजा त्यामुळे आमच्याकडून काही चूक झाली तर ती मोठ्या मनाने पोटात घालून घ्या किंवा ती चुक आम्हाला समजावून सांगा. तुम्ही तुमची विकास कामे हक्काने आमच्या कडून करून घेऊ शकता मशाल निशाणी समोरील बटन दाबून तुमचा मतदान रुपी भरघोस आशीर्वाद आम्हाला द्या. भरघोस मताधिक्याने आम्हाला निवडून आणा. अशी भावनिक साद ॲड. ज्योत्स्ना विनायक काताळकर यांनी घातली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका सचिव विलास गुरव, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सिद्धी संतोष रामगडे, उपतालुका प्रमुख अंकुश शिगवण, उपविभाग प्रमुख निखिल मोरे, माजी सभापती गणपत शिगवण, शाखाप्रमुख आनंद शिगवण यांच्यासह कुणबी समाजाचे कार्यकर्ते मतदार बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें