मारक्रम–मिलरच्या फटकेबाजीचा जलवा; दक्षिण आफ्रिकेचा कॅनडावर ५७ धावांनी दणदणीत विजय

मारक्रम–मिलरच्या फटकेबाजीचा जलवा; दक्षिण आफ्रिकेचा कॅनडावर ५७ धावांनी दणदणीत विजय

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील नवव्या सामन्यात गट ‘ड’ मध्ये दक्षिण आफ्रिकेने कॅनडावर ५७ धावांनी शानदार विजय मिळवला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आक्रमक खेळाचे दर्शन घडवत २० षटकांत ४ बाद २१३ धावांचा भक्कम डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत कॅनडाला ८ बाद १५६ धावांत रोखले.

नाणेफेक जिंकून कॅनडाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र एडन मारक्रमने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत ३२ चेंडूंमध्ये १० चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५९ धावांची तुफानी खेळी केली. क्विंटन डी कॉकने २२ चेंडूंमध्ये २५ धावा, तर रायन रिकेल्टनने २१ चेंडूंमध्ये ३३ धावांचे योगदान दिले. डेव्हिड मिलरने २३ चेंडूंमध्ये नाबाद ३९ धावा, तर ट्रिस्टन स्टब्सने १९ चेंडूंमध्ये नाबाद ३४ धावा करत डावाला वेग दिला. परिणामी दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत २१३ धावांचा मजबूत स्कोअर उभारला.

कॅनडाकडून अंश पटेलने ३ बळी घेतले. दिलप्रीत बाजवा यांनी १ बळी मिळवला.

२१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात दोन गडी बाद झाले. दिलप्रीत बाजवा शून्यावर, तर युवराज समरा १२ धावांवर बाद झाला. नवनीत धालीवालने ४९ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६४ धावांची झुंजार खेळी केली. हर्ष ठाकेरने ३३ धावा जोडल्या. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने कॅनडाचा डाव २० षटकांत ८ बाद १५६ धावांवर थांबला.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगिसानी एनगिडीने घातक मारा करत ४ षटकांत ३१ धावांत ४ बळी टिपले. मार्को यान्सेनने २, तर कागिसो रबाडा आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

अचूक गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हा सामना पूर्णतः आपल्या बाजूने वळवला. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी लुंगिसानी एनगिडीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत आपली विजयी मोहीम दमदारपणे सुरू ठेवली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें