गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्षपदी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड

आबलोली (प्रतिनिधी)
गुहागर तालुका सरपंच संघटनेची बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर नव्याने निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. पुढे संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी समित सत्यवान घाणेकर यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची फेरनिवड सर्वानुमते करण्यात आली.

तसेच, सचिवपदी जान्हवी धनंजय विखारे, खजिनदारपदी आशीर्वाद दयानंद बावस्कर,कार्याध्यक्षपदी सचिन रामचंद्र म्हसकर, यांची निवड झाली.

सदस्य म्हणून दिव्या सुमित वनकर, आर्या अमित मोरे, कोमल काशिनाथ मुरमुरे, प्रगती प्रकाश मोहिते, सिया सचिन गुजर, विजय अर्जुन तेलगडे, नारायण धोंडू आग्रे आणि मानसी मंगेश कदम यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल गुहागर तालुक्यातील सर्व समाजघटकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात गावपातळीवरील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें