SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟣 SRK तायक्वांदो क्लबच्या स्वरा साखळकर हिCHI जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कास्यपदकाची कमाई

रत्नागिरी

रत्नागिरी येथे पार पडलेल्या १९ व्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज पुमसे व क्युरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ मध्ये SRK तायक्वांदो क्लब, रत्नागिरी येथील खेळाडू सुवर्णकन्या स्वरा साखळकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्ण पदके आणि 1 कास्यदकाची कमाई केली. स्वरा हिने आजपर्यंत तायक्वांदो खेळात 38 सुवर्णपदके 15 रौप्य पदके तर 8 कास्य पदके अशी एकूण 61 पदकांची कमाई केली आहे

ही स्पर्धा आज रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. जिल्ह्यातील एकूण 700 नामवंत खेळाडूंमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत स्वरा ने आपल्या कौशल्याचे आणि मेहनतीचे दर्शन घडवले. या यशामागे तिचे प्रशिक्षक तसेच अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारे SRK तायक्वांदो संस्थेचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर तसेच तिचे आई-वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

स्वरा ही नगरपरिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री मोटे सर, क्रीडा शिक्षक श्री शेंडगे सर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप तालुका समन्वयक विनोद मयेकर महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष श्री व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर मुख्याध्यापक, पालक, क्रीडाशिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आणि समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]