शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला 

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला

 

मंडणगड – संदीप शेमणकर

तालुक्यातील शेवरे गावातील प्रसिद्ध असलेल्या नवसेवाली बाय अशी ख्याती असलेल्या ८४ गावाची मालकीण असलेल्या जागृत देवी वरदान देवीची ढाल काठीची दिनांक २३ फेब्रुवारी पासून ते २८ फेब्रुवारी पर्यंत गाव भेटीसाठी मिरवणूक साठी नेण्यात येणार असून देवीचे गावोगावी गावांतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तालुक्यातील शेवरे गावातील वरदान मातेची ढालकाठी मंडणगड तालुक्यातील शिमगा उत्सवाचा केंद्रबिंदू आहे २२ फूट उंचीच्या ढाल काठीवर आरूढ झालेली देवीची ढाल काठी पूर्वी ८४ गावांतून मिरवणूक काढली जात असे परंतु चाकरमानी मुंबई शहरात नोकरी धंद्यासाठी गेल्याने आता ४० ते ५० गावांतून मिरवणूक काढली जाते मुंबईतील चाकर मानी खास आपल्या गाव देवीच्या शिमगा महोत्सव मध्ये सामील होऊन देवीच्या ढालकाठी बरोबर खेळी जातो.तालुक्यातील शेवरे गावातील शिमगा उत्सव आगळावेगळा पाहायला मिळतो शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या तालुक्यातील ही एकमेव ढालकाठी असून तिचे भक्तिमय आकर्षण असते गावाच्या थोड्याच अंतरावर वरदान देवीचे पुरातन काळातील मंदिर असून वरदान देवी मानाई,झोलाई वाघजाई भैरी, चणकाई अशी पाच मंदिरे आहेत शिमगा उत्सव मध्ये दुसऱ्या होळीला २२ फूट उंच बांबूच्या काठीचे पूजा करण्यात येते ढाल काठी ला रंगबिरंगी कपड्याने सजवून टोकावर चांदीचा कळस व गावदेवीचा भगवा ध्वज लावण्यात येऊन परंपरेनुसार ढालकाठी वरदान देवीच्या प्रांगणात उभे करून गावातील सर्व लहान थोर ग्रामस्थ मंडळी सह देवीचे पुजारी वरदान देवीचे पूजा अर्चा करुन देवीला साकडे घालून गाऱ्हाने घालून देवळातील देवीसमोर एक फुल ढाल काठी जवळ आणून ढालकाठी ची पूजा करुन गाऱ्हाने मांडतो म्हणजे वरदान देवी ढालकाठीवर आरूढ होते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे रात्री सातच्या सुमारास देवीची ढालकाठी बरोबर मिरवणूकी साठी जाणारे खेळे ढाल काठीला घेऊन गावोगावी गाव भेटीला वाजत, गाजत नगारे वाजवून घंटा नाद करत वरदान मातेकी जय असे जयजय कार करत मिरवणुकीसाठी नेली जाते परंपरेनुसार सर्वप्रथम देवीला नायने या गावापासून मिरवणूक ची सुरुवात केली जाते गावाच्या वेशी पाशी देविचे आगमन होताच नगारांचे आवाज ऐकताच त्या गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मुले देवीच्या स्वागता साठी सामोरे येवून गावात नेले जाते मानकरी असलेल्या ठिकाणी उभी केली जाते सुवासणींनी देवीचे खणा नारळाने ओटी भरून झाल्यावर पुजारी गाऱ्हाणं घालतो. देविची गाव भेट झाली की ढाल काठीला घेऊन डोंगरदरा पायवाटा तुडवत इतर गावांतून नेले जाते गाव,वाडी कोंडवाडी परिसर मध्ये देवीचे भक्ती भावानी स्वागत केले जाते. प्रत्येक गावोगावी देवीची खणा नारळ ने ओटी भरून देवीला नवस केले व जुने नवस फेडले जाते देवी नवसाला पावते म्हणून देवीला नवसेवाली बाय असे म्हंटले जाते अहोरात्र मंडणगड, दापोली तालुक्यातील गावोगावच्या भेटीनंतर देवीची ढालकाठी वाजत गाजत गुलाल उधळत शेवरे गावात आणले जाते त्या दिवस रात्रभर आपल्या देवीचे जल्लोषात स्वागत करुन ढाल काठीला उभी हातावर घेऊन नाचविली जाते हा उत्सव सोहळा पाहण्यासाठी शेजारच्या गावांतील भक्त जणांची उपस्थिती असते, दोन दिवस गावात गाव, कोंड येथे देवीची मनोभावे भक्तिभावाने पूजा करून प्रत्येक घरा घरानातून सुवासनी खणा नारळाने ओटी भरतात पुजारी प्रत्येकाच्या घरी सुख शांती मिळावी म्हणून गाऱ्हाणं घालतो खास करून वरदान देवीची बहिण असलेल्या डौली गावातील जनाई देवीची पालखी शेवरे गावात देवीच्या भेटीसाठी येवून दोन्ही सख्या बहिणीची भेट घडवून आणले जाते दोन्ही गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरते, शेवटच्या होळीच्या दिवशी गावातील होळी पेटवून झाली की वरदान देवीची ढाल काठी रात्री वाजत गाजत देवळातील सानेवर नेले जाते.देवळातील होळी पेटवून झाली की होळी भोवती ढाळकाठीला प्रदक्षिणा घालून ढाल काठीला सानेवर बसविली जाते दुसऱ्या दिवशी अर्थात धुळवट दिवशी गावों गावांतील भक्त जण देवीला नवस करण्या साठी व दर्शनासाठी आवर्जून येतात त्या दिवशी सानेवर जत्रेचे स्वरूप येते, गावातील कलावंत ढोलकी च्या तालावर मनोरंजन करतात संध्याकाळी ढाळकाठीची मनोभावे पूजा करून साकडे घालून तेथील फुल ग्राम देवतेच्या देवळात नेले जाते म्हणजे देवी देवळात पुन्हा आरूढ होते असे म्हटले जाते

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]