सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

🏥 सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

रत्नागिरी, २४ फेब्रुवारी २०२६:

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात कर्मचाऱ्यांसाठी विशेष ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.

 

वर्षभर कार्यरत मत्स्यालयासाठी आरोग्य सुरक्षा महत्त्वाची

 

झाडगाव येथील ‘मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय’ हे वर्षातील ३६५ दिवस कार्यरत असते. दरवर्षी २ लाखांहून अधिक पर्यटक व विद्यार्थी येथे भेट देतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

 

यावेळी केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी, “कर्मचाऱ्यांचे आरोग्य हीच संस्थेची खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन केले.

 

आधुनिक आरोग्यसेवेची माहिती

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. शेखर कोवळे, ऑनररी प्रशासकीय सल्लागार यांनी रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा, २४ तास कॅज्युअल्टी, बाह्यरुग्ण विभाग (OPD), तसेच जीवनशैलीजन्य आजारांपासून बचावासाठी नियमित तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले.

 

डॉ. आर्या माने यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या तज्ञ डॉक्टरांची माहिती देताना जनरल सर्जरी, अस्थिरोग सर्जरी, न्युरो सर्जरी, कॅन्सर शस्त्रक्रिया, डायलिसीस (मोफत), डोळे तपासणी, २४x७ OPD व IPD सेवा यांची माहिती दिली.

 

तपासणी व हेल्थ कार्ड वितरण

 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. केतन चौधरी यांचे ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ तयार करून करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने कर्मचाऱ्यांची प्राथमिक तपासणी केली. यात रक्तदाब (BP), रक्तातील साखर (Sugar) आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणीचा समावेश होता.

 

हेल्थ कार्डच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना संबंधित रुग्णालयात विविध तपासण्या, सल्लामसलत व उपचारांवर विशेष सवलती मिळणार आहेत. या उपक्रमास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

मार्गदर्शन व विशेष परिश्रम

 

या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आसिफ पागारकर, डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम तसेच संशोधन व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य हितासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे केंद्र प्रशासनाने सांगितले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें