शनिवार दि.२८ रोजी सावर्डे येथे कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन

शनिवार दि.२८ रोजी सावर्डे येथे कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन

 

आम. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती

आबलोली (संदेश कदम)

श्री. देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी आयोजित कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ व रविवार दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे उत्साहात संपन्न होणार असून या क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा सकाळी ०९:३० वाजता चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या शुभहस्ते होणार असून या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धां कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक सचिन पाकळे, श्री. देवांग कोष्टी समाज महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांतशेठ बाईत, उद्योजक विजय तेटांबे आदी. मान्यवर उपस्थित राहणार असून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धांचा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातील तमाम श्री.देवांग कोष्टी समाज बांधवांनी आणि क्रिकेट प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन श्री. देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी अध्यक्ष गजानन लोकरे, कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, सचिव अरविंद भंडारी, खजिनदार दीपक रेपाळ यांचे सह सर्व कार्यकारणी सदस्यांनी सल्लागार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें