शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

नवीमुंबई (मंगेश जाधव)
पुणे येथील ऐतिहासिक वास्तू लाल महल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने “शिवसन्मान पुरस्कार सोहळा २०२६” मध्ये भाकर फाऊंडेशनचे संस्थापक ॲड. दिपक सोनावणे यांना ‘शिव सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश चव्हाण (संस्थापक अध्यक्ष – रुग्ण हक्क परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला भानुप्रताप बर्गे (माजी सहा. पोलीस आयुक्त), डॉ. हनुमंत चव्हाण (अधीक्षक – डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी, पुणे), सचिन कक्काणी (उपाध्यक्ष – सह्याद्री हॉस्पिटल्स समूह) तसेच चंद्रशेखर देणणकर (माजी विशेष पोलीस महानिरीक्षक) यांची विशेष उपस्थिती होती. महिला-बालक तसेच तृतीयपंथी समुदायाच्या प्रश्नांवर सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ॲड. दिपक सोनावणे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]