मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार

मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार

९ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; १० मार्चपासून डिजिटल आणि प्रत्यक्ष सदस्य नोंदणी अभियान

मुंबई ~
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापनदिन उद्या ९ मार्च २०२६ रोजी साजरा होत असून या निमित्ताने पक्षप्रमुख रायगडावर जाऊन सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करणार आहेत. रायगडावर यांना अभिवादन करून स्वतःपासून सदस्य नोंदणीची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिलेल्या संदेशातून दिली.

मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा हा २० वा वर्धापनदिन असून १० मार्च २०२६ पासून राज्यभर मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. ही नोंदणी केवळ महाराष्ट्र सैनिकांपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राला आकार देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या अभियानात सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पक्षाची सदस्य नोंदणी यावेळी डिजिटल स्वरूपातही होणार असून बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मैदानं, बागा यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी स्टॉल लावून नागरिकांशी संवाद साधत सदस्य नोंदणी करण्याच्या सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, १९ मार्च रोजी निमित्त मुंबईतील येथे होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज्यभरातील महाराष्ट्र सैनिक सहभागी होणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें