चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न 

चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न 

 

समाजाला कर्मकांडातून मुक्त करणे हेच सत्यशोधक समाजाचे काम :-मारुतीकाका जोयशींचे प्रतिपादन

तळवली (मंगेश जाधव)

चिपळूण: सत्यशोधक विचार स्विकारणे हे धाडसाचे आणि समाजाला कर्मकांडातून मुक्त करून, सत्याचा मार्ग दाखवणे हे सत्यशोधक समाजाचे काम आहे. आज समाजाला सत्यशोधक विचारधारा पटू लागली असून, समाज परिवर्तनाकडे वळत आहे असे प्रतिपादन कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोयशी यांनी चिपळूण येथे केले.

‌ धर्मातील अनिष्ट रूढी परंपराच्या विरोधात व शोषित, पीडीत, वंचित बहुजनांच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या मान सन्मानासाठी, स्वाभिमानासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यरत असलेली सत्यशोधक समाज संघ , महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती, जिल्हा रत्नागिरी या संघटनेच्यावतीने चिपळूण तालुक्यातील कळंबट गावचे रहिवासी सत्यशोधक प्रवर्तक श्री. कृष्णाजी कोकमकर गुरुजी यांचे वडील निसर्गवासी यशवंत कोकमकर यांचा २७ वा स्मृतीदिन आणि सत्यशोधक व शिवप्रवर्तक समिती कृती कार्यक्रम व नियोजन, चर्चा संबंधित कार्यक्रम साईदर्शन, पागझरी, चिपळूण येथे कोकणचे गाडगेबाबा श्री. मारुतीकाका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संघटनेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम व प्रा. पावटे सर (साखरपा, संगमेश्वर) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय महापुरुषांच्या प्रतिमापुजन व जिजाऊ वंदनाने झाली. त्यानंतर निसर्गवासी वासंतीकाकी जोयशी यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच प्रमुख अतिथी ‌, मार्गदर्शक मारुतीकाका जोयशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रामुख्याने सत्यशोधक प्रवर्तक श्री.व सौ कोकमकर यांचे सुपुत्र तुषार कोकमकर यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल या उभयतांचा संविधानाची प्रत,शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र फुटक यांनी कोकमकर यांच्या वयोवृद्ध मातोश्रीचे पुजन केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रा.पावटे सर यांनी कौतुक करून प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

 

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष प्रदीप कांबळे (मंडणगड) यांनी केले. या कार्यक्रमाला महेंद्र जालगावकर (जिल्हा सचिव, दापोली) रमेश बोरकर (दापोली), विकास सकटे (राज्य सदस्य, महाड), चंद्रकांत मांडवकर, अनिल राणे, चित्रक मोहिते, श्रीधर पालशेतकर (चिपळूण), हरिचंद्र फुटक(संगमेश्वर), संजय जिनगरे (कोषाध्यक्ष, चिपळूण) सुभाष मोहिते (रत्नागिरी जिल्हा असंघटित कामगार, नेते), संदीप पवार (असंघटित कामगार कार्यकर्ता, चिपळूण) आणि विलास डिके (जिल्हा, महासचिव, संगमेश्वर) आधी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें