जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत आनंदी बाजार व जागतिक महिला दिन उपक्रम उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत आनंदी बाजार व जागतिक महिला दिन उपक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरी
जि.प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी ही शाळा सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. यावर्षीही या शाळेने “आनंदी बाजार “या उपक्रमाचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन केले.
महिला दिनाचे औचित्य साधून देशातील थोर महिला यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमाला जोडूनच आनंदी बाजारही मुलांनी भरवला. तद्नंतर आनंदी बाजार या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आनंदी बाजाराचा मुख्य उद्देश आपल्या परिसरातील विविध वस्तू यांची खरेदी विक्री मुलांना समजावी, दैनंदिन व्यवहार कसे करावेत, स्वावलंबन, क्षमप्रतिष्ठा, आर्थिक बाबींचा व्यवहार, विविध जीवन कौशल्य आत्मसात करणे , नवनिर्मिती, आनंददायी शिक्षण, हिशोब करणे , वस्तूंची जाहिरात करणे या गोष्टी मुलांनी आत्मसात करणे हा मूळ उद्देश साध्य झाला.
महिला दिनाचे औचित्य साधून विविध फनी गेम्स, खेळ यांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचाही बक्षीस समारंभ संपन्न झाला. विद्यार्थी- शिक्षक-पालक-ग्रामस्थ या सर्वांचे स्नेहभोजन ही आयोजन करण्यात आले होते.
या दोन्ही उपक्रमसाठी ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, विविध समित्या, विद्यार्थी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व केंद्रप्रमुख- भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, विशेष शिक्षिका तृप्ती शिरगावकर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाविषयी भाग्यश्री हिरवे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस यांनी विशेष कौतुक केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]