तळवली आगरवाडी येथे उद्या विविध कार्यक्रम श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 चे आयोजन

highlight

तळवली आगरवाडी येथे उद्या विविध कार्यक्रम
श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 चे आयोजन

गुहागर -प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली आगरवाडी येथे श्री सुकाईदेवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 यांच्यावतीने शनिवार दि.14 रोजी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी 8 वा. दीप प्रज्वलन व उद्घाटन सोहळा सकाळी 8. 30 वाजता मुलांच्या स्पर्धा दुपारी 2 श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 3 वा. महिला मंडळ हळदीकुंकू व दिंडी दुपारी 3. 30 वाजता महाआरती सायंकाळी 4 वा.महिला स्पर्धा सायंकाळी 6 वा.प्रासादिक भजन सायंकाळी 7:30 वाजता महाप्रसाद रात्र 9.30 वा. विद्यार्थी गुणगौरव सोहळा व रात्र ठीक 10:30 वाजता सुनील मते लिखित व मंदार मते दिग्दर्शित “कलंक” हा दोन अंकी सामाजिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 च्या वतीने करण्यात आले आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें