गुहागरमध्ये बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीला जामीन

highlight

गुहागरमध्ये बेकायदा शस्त्र प्रकरणातील आरोपीला जामीन

₹१५ हजारांच्या जामिनावर सुटका; पोलिस कोठडीची गरज नसल्याचा न्यायालयाचा निर्णय

बातमी:
गुहागर : गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अंतर्गत दाखल असलेल्या बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय श्रीधर फुणगुस्कर (रा. वेलदूर नवानगर, ता. गुहागर) याला गुहागर न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने आरोपीस ₹१५,००० च्या जामिनावर सुटका मंजूर केली.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून एक गावठी बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त केल्याचा दावा करत न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती.

मात्र आरोपीतर्फे अ‍ॅड. अलंकार विखारे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करत पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आधीच पोलिसांच्या ताब्यात असल्याने पुढील तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक नसल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर करत सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अ‍ॅड. अलंकार विखारे यांनी आरोपीची बाजू मांडली असून त्यांना वरिष्ठ अ‍ॅड. संकेत साळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें