संविधान चषक २०२६ स्पर्धेला मान्यवरांची उपस्थिती; खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट

संविधान चषक २०२६ स्पर्धेला मान्यवरांची उपस्थिती; खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट

निळजे लोढाहेवन येथे पहिल्यांदाच भव्य नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा; आमदार राजेश मोरे व पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग


नवी मुंबई (मंगेश जाधव):

लोढाहेवन निळजे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७११, पंचशील सामाजिक संस्था (रजि.) आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “संविधान चषक २०२६” या भव्य नाईट अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २१ व २२ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार राजेश मोरे (कल्याण ग्रामीण) तसेच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे (परिमंडळ ३, कल्याण) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी महापौर हर्षाली विजय चौधरी-थविल, उपमहापौर राहुल दामले, माजी आमदार राजूदादा पाटील, क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष विनोद रतन पाटील, नगरसेवक गजानन मोतीराम पाटील व नगरसेविका शैलेजा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पोलीस सहआयुक्त सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली.

स्पर्धेसाठी सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

निळजे लोढाहेवन परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या “संविधान चषक २०२६” स्पर्धेला पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवतरुणांच्या सहभागामुळे परिसरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें