दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

मुंबई – संदीप शेमणकर 

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर (प.) यांच्या वतीने दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शिवसेना नेते तथा खासदार मा. श्री. अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार, तसेच कक्षाचे सचिव निखिल सावंत, अशोक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.

मंडळ रेल्वे प्रबंधक श्री. हिरेश मीना व चीफ ओ.एस. श्री. निरज मेंटल यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक यशवंत खोपकर, प्रसारक अनंत पवार, उपसंघटक राजेंद्र पेडणेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनानंतर राज्यांतर्गत अनेक रेल्वेगाड्या बंद करून त्यांच्या वेळापत्रकात परराज्यातील गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये सह्याद्री एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, पुणे–भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्सप्रेस यांसारख्या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

दरम्यान, दादर–रत्नागिरी पॅसेंजरऐवजी दादर–गोरखपूर एक्सप्रेस सुरू केल्याने मुंबई व कोकणवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]