फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

highlits

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

रत्नागिरी – संदीप शेमणकर 

(शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, श्रमिक विद्यालय आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल येथे फिनोलेक्स पाईप अँड फिटिंग्सच्या CSR उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाउंडेशनच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी संपन्न झाले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात टेक्निकल डायरेक्टर रामबाबू संका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, अमित घोरपडे, अभिषेक साळवी, मुकुल माधव फाउंडेशनच्या श्रीमती यास्मिन शेख तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी भायजे व जि. प. सदस्य ऍड. महेंद्रजी मांडवकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

यावेळी मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत संस्थेला पुढील काळातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. असून प्रास्ताविक मधुकर थुळ सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कल्पना मेस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अमित पवार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें