मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

आबलोली (प्रतिनिधी)

मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६ मध्ये इयत्ता तिसरीतील कु. रिद्धी बाळासाहेब लबडे हिने राज्यस्तरीय सहभागातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

लिटिल चॅम्प इंग्लिश स्कूल, जानवळे येथे शिक्षण घेणाऱ्या रिद्धीने या परीक्षेत ६२ टक्के गुण मिळवत (१८६/३००) ‘बी+’ श्रेणीसह आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या या यशामुळे शाळा, पालक आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिद्धी ही अभ्यासू, जिज्ञासू आणि मेहनती विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. यापूर्वीही तिने शालेय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत अनेक पदके मिळवली आहेत. तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे तिचा ‘हुशार विद्यार्थीनी’ म्हणून गौरव केला जात आहे.

तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक हेमंत शिरकर, मार्गदर्शक मुंडेकर सर, शिक्षकवर्ग तसेच पालक डॉ बाळासाहेब लबडे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धीच्या या यशामुळे जानवळे परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]