सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

वयाची ५८ वर्षे शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करून गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच गुहागर तालुका चर्मकार समाजाचे तालुका सचिव संतोष पांडुरंग पालशेतकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गुहागर तालुका चर्मकार समाज यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील आबलोली येथे संतोष पांडुरंग पालशेतकर यांच्या निवासस्थानी त्यांचा गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आणि पुढील जीवन निरोगी लाभो आणि कुटुंबाची भरभराट होवो.

आपणाकडून नोकरीमध्ये असतानाही जशी सामाजिक कार्याची जबाबदारी पार पडली जात होती तशीच जबाबदारी सेवानिवृत्तीनंतरही आपण पार पाडाल आणि समाजाची अधिकाधिक सेवा आपल्या हातून घडत राहो. अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने संतोष पांडुरंग पालशेतकर, पत्नी सौ. शैला संतोष पालशेतकर यांचा शाल, श्रीफळ आणि भूपे देऊन मान्यवरांच्या हस्ते सापत्नीक सत्कार करण्यात आला. संतोष पालशेतकर यांनी ग्रामीण भागातून सामाजिक सेवेचा आपला प्रवास सुरू करत त्यांनी आपल्या जिद्दने आणि मेहनतीच्या बळावर आरोग्य सेवेत वर्ग 4 कर्मचाऱ्यांपासून पदोन्नती घेत कनिष्ठ सहाय्यक या पदापर्यंत उल्लेखनीय मजल मारली तसेच जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये त्यांची संचालक पदावर निवड झाली होती. त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर केले. त्यांना त्यांच्या पत्नीची समर्थ साथ लाभल्यानेच. ते निस्वार्थी पणे समाजाची सेवा करत आहेत. शासकीय सेवेबरोबरच समाजसेवेमध्येही संतोष पालशेतकर यांचे योगदान मोलाचे आहे. सामाजिक कार्यात सुख ,दुःखात ते धावून जातात. सामाजिक स्तरावर त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.यावेळी गुहागर तालुका चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष विजय जानवळकर, जिल्हा कार्यकारणी स्वीकृत सदस्य विनोद जानवळकर, ज्येष्ठ सल्लागार अशोक जानवळकर, जानवळे गावचे पोलीस पाटील संतोष जानवळकर, सदस्य नथुराम जानवळकर, संदीप कोंडविलकर आदी. सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना संतोष पालशेतकर यांनी यापुढेही सामाजिक कार्यात स्वतःला झोकुन देऊन सामाजिक काम करणार विधायक उपक्रम राबवून तरुणांना एकत्र आणणार असा विश्वास ही संतोष पालशेतकर यांनी व्यक्त केला व समाजाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सल्लागार अशोक जानवळकर यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें