नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

गुहागर
वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार, नाट्यकलावंत श्री सुदाम भागोजी कोळथरकर यांचा शाळा व्यवस्थापन समिती शाळा वेलदुर नवानगर मराठीतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, शिक्षक वृंद धन्वंतरी मोरे ,सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते, सुदाम भागोजी कोळथरकर यांनी वेलदूर नवानगर येथे विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे चंद्र होता साक्षीला ,फुटला पाझर पाषाणाला ,पातीव्रतेचा झेंडा, देव्हारा, रथा संसाराचा, पाऊले चालती, स्वराज्याच्या वाटेवर, हरिश्चंद्र तारामती इत्यादी अनेक नाटकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका सादर केलेली आहे व प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहे.त्यांनी लोक जागृती चे काम केलेले आहे .सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश पाटील सर यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें