नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

गुहागर

गेले पंचवीस तीस वर्ष भजनी कलावंत म्हणून काम केलेले दिनेश देवाळे यांचा नूतन गोपाळकृष्ण भजन मंडळातर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संस्थापक संचालक श्री मनोज पाटील, प्रतिष्ठानचे सल्लागार व माजी नगरसेवक संजय मालप साहेब ,भजनी कलावंत गोविंद देवाळे ,युवा कार्यकर्ते सुजल मालप ,हर्ष आलिम, वृषभ घरटं आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी बोलताना मनोज पाटील म्हणाले की कोकणच्या या मातीत अनेक भजनी कलावंत जन्माला आलेले आहेत.,त्यांच्यामुळे भजनीकला जिवंत आहे .माजी नगरसेवक संजय मालप साहेब म्हणाले दिनेश बुवा देवाळे हे नूतन गोपाळ कृष्ण प्रसादिक भजन मंडळाचे बुवा म्हणून प्रसिद्ध आहेत ,त्यांनी गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी भजन केलेले आहेत.त्यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद वाटत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें