एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेतमध्ये इयत्ता पहिली तील विद्यार्थी कुमार तेज तेजस केंबळे याने 100 पैकी 67 गुण, इयत्ता पहिली तील कुमारी श्रेया सचिन सोनवलकर हिने 100 पैकी 62 गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे.इयत्ता तिसरी तील कुमार शौर्य संजय राठोड याने 100 पैकी 67 गुण , कुमारी हर्षिता नरेंद्र रहाटे हिने 100 पैकी 67 गुण मिळवून सुयश संपादन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिनशेठ बाईत, सेक्रेटरी सौ. स्नेहल बाईत व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे यांनी या सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सचिनशेठ बाईत, सौ. स्नेहल बाईत यांनी अभिनंदन केले यावेळी मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे , श्री. दामोदर गोणबरे ,सौ. शर्मिष्ठा साळुंखे, सौ. शितल सोनवलकर, सौ. शमीम मुल्ला, सौ. प्रांजली शिगवण तसेच श्री. तेजस केंबळे आदी. उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें