भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

प्रतिनिधी :- निलेश रहाटे 

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ३० मधील भोपर परिसरात २०२३ पासून सुरू झालेली तीव्र पाणीटंचाई आजही कायम असून, प्रशासन मात्र नागरिकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर दिसून येत आहे एक दिवसाआड आणि अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना देखील नागरिकांवर पूर्ण वर्षाचे पाणी बिल आकारले जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

 

अधिक धक्कादायक बाब म्हणजे KDMC प्रशासनाची उघड बेफिकीरी. प्रत्यक्षात वर्षभर नियमित पाणीपुरवठा होत नसून, केवळ अंदाजे 5 ते 6 महिनेच अपुरा व अनियमित पाणीपुरवठा केला जातो. तोही प्रेशर कमी असतो त्यामुळे पाणी पुन्हा मिळेल की नाही याची शाश्वती नाही पण बिलात कोणतीही सवलत न देता सरसकट पूर्ण वर्षाचे बिल आकारले जात असल्याचा आरोप तक्रारदार व नागरिकांन कडून करण्यात येत आहे.

 

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

विशेष म्हणजे, पाणी बिल कमी करण्याच्या मागणीसाठी २०२३ पासून निलेश रहाटे RTI कार्यकर्ता व पत्रकार व इतर नागरिकांनी लेखी अर्ज सादर केले होते मागील तब्बल तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा, अर्ज, तक्रारी आणि प्रत्यक्ष भेटी देऊनही कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. संबंधित अधिकारी ‘बघ्याची भूमिका’ घेत बसल्याचे स्पष्ट दिसून येत असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

यात आणखी भर म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारला “मीटर लावून घ्या, त्यानंतर प्रत्यक्ष वापर (युनिट) पाहून बिल कमी करू” असा लेखी सल्ला दिला होता. त्यानुसार तक्रारदारांनी स्वतःच्या खर्चाने पाणी मीटर बसवले; मात्र मीटर बसवल्यानंतरही कर्तव्यदक्ष अधिकारी बिल कमी करण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाच्या आश्वासनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, KDMC च्या पाणीपुरवठा पाईपलाईनवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टॅप वर २०२५ मध्ये कारवाई करण्यात आली होती मात्र, यावर कठोर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकारी केवळ दिखाऊ कारवाई करत टॅप काढून टाकण्यापुरतेच मर्यादित राहत आहेत.

 

यामुळे प्रामाणिकपणे अधिकृत पाणी कनेक्शन घेतलेल्या नागरिकांनाच अन्याय सहन करावा लागत असल्याची भावना तीव्र झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही पाणी बिलात कोणतीही दुरुस्ती किंवा सवलत मिळालेली नाही. उलट, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिल कमी करण्याबाबत लेखी सूचना देऊनही खालच्या पातळीवरील अधिकारी त्या आदेशांकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप रहाटे नी केला आहे.

 

काही अधिकाऱ्यांकडून “थकीत बिलावरील दंड मी भरतो” पण मला थोडा वेळ दया अशी बेफिकीर वक्तव्ये केली जात असल्याने प्रशासनातील निष्काळजीपणा आणि जवाबदारीशून्यता उघड होत आहे. यामुळे तक्रारदार व नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात यावी अशी तक्रार आयुक्त हयांना देण्यात आली आहे.

दरम्यान, आयुक्त गोयल यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले किंवा तक्रारदार व नागरिकांना योग्य न्याय दिला नाही, तर तक्रारदार थेट आयुक्तांच्या केबिनबाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]