जागतिक पुस्तक दिनानिमित्त दादरमध्ये कविसंमेलन, अभिवाचन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात

*जागतिक पुस्तक दिनानिमित्त दादरमध्ये कविसंमेलन, अभिवाचन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनानिमित्त २३ एप्रिल २०२६ रोजी दादर (पश्चिम) येथील डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूटमध्ये कविसंमेलन, अभिवाचन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. “श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल” आणि “मराठी साहित्य व कला सेवा” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमातून वाचनसंस्कृतीचा जागर घडवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवगर्जनेने झाली. त्यानंतर प्रस्तावनेतून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. विविध कवी आणि अभिवाचकांनी ‘पुस्तक’ या विषयावर आधारित स्वरचित कविता आणि निवडक साहित्यकृतींचे अभिवाचन सादर केले. चंद्रकांत दढेकर, मीनल शेकटकर कांबळे, मीना ठाकोर, राजन देसाई आणि रंजन गावडे यांनी अभिवाचन सादर केले, तर सरोज सुरेश गाजरे, कल्पना उबाळे, कल्पना मापूसकर, ज्योती राखुंडे, प्रतिभा नवघरे, समिधा विकास नलावडे, सीमा खान शेख, मनोहर वाळिंबे, संतोष धर्मराज मोहिते, वनिता सचिन साळुंखे आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी कविता सादर केल्या.
शिवा बावणीचे सादरीकरण अरहंत किरण जाधव, श्रेयस रवींद्र कदम, ऋतुजा कौशल पाटील आणि वनिता सचिन साळुंखे यांनी विविध छंदांमधून सादर केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. हेमंतराजे गायकवाड लिखित “प्रतापगड युद्ध : हिंदू पदपातशाह छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय” या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी आपले विचार मांडले आणि वाचनसंस्कृतीच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात सादरीकरण केलेल्या सर्वांना जयंत नारायण भावे यांचा “प्रतिबिंब” हा काव्यसंग्रह अक्षरमंच प्रकाशनचे सर्वेसर्वा डॉ. योगेश विजय जोशी यांच्याकडून भेट देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूटच्या आर्णा, साहिल, निलिमा या कर्मचारीवृंद आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. छायाचित्रणाची जबाबदारी आदित्य औताडे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली. साहित्यिक पत्रकार डॉ. अनुज केसरकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें