सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते अरविंद येलवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६’ ने सन्मानित
नवीमुंबई (मंगेश जाधव)
‘दिशा महाराष्ट्राची’ या यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार नेवरेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून नुकतेच खेड येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यभरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये मंडणगड तालुक्यातील आंबवणे खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद प्रकाश येलवे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानाचा “छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्मारामजी चव्हाण (प्रो. कबड्डी सामानाधिकारी), कवी संमेलन अध्यक्ष देवानंद यादव (सुप्रसिद्ध कवी), माधवीजी बुटाला (नगराध्यक्ष- नगरपरिषद खेड), आफियाजी पालेकर (सभापती- पंचायत समिती खेड), संदेशजी राऊत सर (जनसंपर्क प्रमुख- कोमसाप दापोली), भगवानजी घाडगे (माजी समाज कल्याण सभापती), आशुतोष साळुंखे (प्रो. कबड्डी – मॅच ऑफिशियल), रोहिदास राजेंद्र केंद्रे (PSI खेड पोलीस स्टेशन) राहुल जाधव (समाजसेवक) भाऊसाहेब कांबळे (सुप्रसिद्ध साहित्यिक- खेड), राजेंद्र शेलार (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (ASI), प्रेरणा सुनिल वाघमारे (उपक्रमशील शिक्षिका), सुधीर कालेकर, हरिश्चन्द्र जाधव गुरुजी उपस्थित होते.
आंबवणे खुर्द सारख्या ग्रामीण भागातील युवकाचा राज्यस्तरावर गौरव होणे ही मंडणगड तालुक्यासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब ठरली आहे. अरविंद येलवे हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे तालुक्यातील नागरिक, विविध सामाजिक संस्था व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें