पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

नवीमुंबई (मंगेश जाधव)

डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप, पनवेलकर संकुल, बदलापूर (पूर्व) यांच्या विद्यमाने शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर पंचशील, त्रिशरण ग्रहण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त शिलाताई तायडे यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना खीरदान केले. कार्यक्रमाला संकुलातील धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]