गुहागरमध्ये घरफोडीचा थरार! गॅरेज चालकाच्या घरातून तब्बल २.३१ लाखांचा ऐवज लंपास

crim

गुहागरमध्ये घरफोडीचा थरार! गॅरेज चालकाच्या घरातून तब्बल २.३१ लाखांचा ऐवज लंपास

घरफोडीच्या घटनेने खालचापाट परिसरात खळबळ; सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि WiFi राऊटर चोरीला

गुहागर | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी एका बंद घरावर डल्ला मारत तब्बल २ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुहागर खालचापाट येथे राहणारे रविंद्र शरद शिंदे (वय ४९) हे व्यवसायाने गॅरेज चालक असून कामानिमित्त ते कल्याण येथे गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून कुलूप उचकटले. त्यानंतर घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून लॉकर उघडण्यात आला. लॉकरमधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि WiFi राऊटर असा मौल्यवान ऐवज चोरून नेण्यात आला.

चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (₹५० हजार), २० ग्रॅमचे मणीमंगळसूत्र (₹८० हजार), ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या (₹४० हजार), रोख ₹६० हजार आणि ₹१,५०० किंमतीचा WiFi राऊटर यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच रविंद्र शिंदे हे तातडीने कल्याणहून गावी परतले आणि त्यांनी गुहागर पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही कार्यरत करण्यात आले आहे. वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें